बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना एक अत्यावश्यक भांडी संच (Essential Kit) मोफत दिला जाणार आहे. या संचामध्ये घरात रोज लागणाऱ्या एकूण 10 वस्तू असतील. चला या योजनेची आणि अर्ज करण्याची सोपी माहिती पाहूया.bandhkam kamgar bhandi sanch
या संचामध्ये मिळणाऱ्या वस्तू या आहेत –
- पत्र्याची पेटी
- प्लास्टिकची स्टूल
- धान्य ठेवण्याची कोठी
- किलो क्षमतेचा डब्बा
- बेडशीट
- चादर
- ब्लँकेट
- साखर ठेवण्यासाठी डब्बा
- चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
- १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर
या सर्व वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा BOCW Registration Number लागेल.
तो मिळवण्यासाठी Google वर “Maha BOCW Profile Login” असे टाइप करा आणि पहिल्या लिंकवर क्लिक करा.
तिथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका आणि ‘Proceed’ बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. तो कॉपी करून ठेवा.
यानंतर अत्यावश्यक भांडी संचासाठीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
तिथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
OTP आला की तो टाकून ‘Verify OTP’ वर क्लिक करा.
स्क्रीनवर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल.
आता तुम्हाला शिबिर (Camp) निवडावे लागेल.
तुमच्या जिल्ह्यात कोणते शिबिर उपलब्ध आहे ते पाहा आणि जवळचे शिबिर निवडा.
नंतर ‘Appointment Date’ या पर्यायावर क्लिक करा.
जर कोटा उपलब्ध असेल तर तारखा दिसतील; नसेल तर १५ दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा.
तुमच्यासाठी सोयीची तारीख निवडा आणि ‘Print Appointment’ बटणावर क्लिक करा.
तुमची अपॉइंटमेंट पावती स्क्रीनवर येईल. तिचा प्रिंट काढा किंवा स्क्रीनशॉट ठेवा.
निवडलेल्या दिवशी पावतीवर दिलेल्या ठिकाणी म्हणजेच शिबिरात जा.
सोबत तुमचे आधार कार्ड आणि अपॉइंटमेंट पावती घ्या.
तिथे तुम्हाला मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक भांडी संच मिळेल.
ही योजना बांधकाम कामगारांसाठी मोठी मदत ठरणार आहे कारण त्यांना घरासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू एकाच वेळी मिळतात, आणि तेही अगदी मोफत.