लाडकी बहीण योजनेची नवी e-KYC प्रक्रिया सुरू! फक्त 2 मिनिटांत करा काम पूर्ण – हप्ता थांबणार नाही!

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून दरमहा मिळणारे ₹१,५०० बंद होऊ नयेत यासाठी प्रत्येक महिलेनं आपली e-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचं आहे. आधी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण आता वेबसाइट नीट चालू आहे आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. ही फक्त २ ते ५ मिनिटांत करता येते.

ई-केवायसी करण्यासाठी तुमचा आणि तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि त्या आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. खाली ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.


पायरी १ – वेबसाइट उघडा आणि आधार पडताळणी करा
१. सर्वात आधी Google मध्ये “लाडकी बहीण महाराष्ट्र gov in” असे टाईप करा आणि अधिकृत वेबसाइट उघडा.
२. तिथे “लाभार्थी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर ‘मी सहमत आहे’ या बॉक्सवर टिक करा आणि ‘OTP पाठवा’ या बटणावर क्लिक करा.
४. तुमच्या मोबाईलवर आलेला ६ अंकी OTP नंबर टाका आणि ‘Submit’ करा.


पायरी २ – कुटुंबातील माहिती भरा
१. जर महिला विवाहित असेल, तर पतीचा आधार क्रमांक द्यावा. आणि अविवाहित असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाकावा.
२. पुन्हा ‘मी सहमत आहे’ या बॉक्सवर टिक करा आणि ‘OTP पाठवा’ बटणावर क्लिक करा.
३. त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि ‘Submit’ करा.


पायरी ३ – जात प्रवर्ग आणि घोषणापत्र भरा
१. पुढच्या पानावर जात प्रवर्ग (Caste Category) निवडा.
२. खाली दोन महत्त्वाचे प्रश्न येतील —

  • “माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नाहीत.” → होय निवडा.
  • “माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.” → होय निवडा.
    ३. सर्व अटी वाचून ‘मी सहमत आहे’ वर टिक करा.

पायरी ४ – प्रक्रिया पूर्ण करा
सर्व माहिती भरल्यावर ‘Submit’ बटण दाबा. काही सेकंदांत स्क्रीनवर “e-KYC Successful” असा मेसेज दिसेल, म्हणजे तुमची प्रक्रिया यशस्वी झाली आहे.


महत्त्वाच्या सूचना:

  • ही संपूर्ण प्रक्रिया फक्त २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते.
  • e-KYC करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२५ आहे.
  • जर तुम्ही e-KYC केली नाही, तर पुढील महिन्यापासून ₹१,५०० चा हप्ता बंद होईल.

म्हणून वेळ वाया न घालवता आत्ताच e-KYC पूर्ण करा, म्हणजे पुढेही तुमच्या खात्यात दरमहा ₹१,५०० जमा होत राहतील.

Leave a Comment