पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जाहीर! ‘या’ दिवशी मिळणार 2,000 रुपये – तुमचं नाव आहे का यादीत?

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता देशभरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने नुकतीच काही पूरग्रस्त राज्यांना आगाऊ मदत दिल्याने आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांमध्येही आशा निर्माण झाली आहे.

सरकारने सांगितले आहे की, पीएम किसान योजनेचा ₹2,000 रुपयांचा 21 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळू शकतो अशी शक्यता आहे.

अलीकडेच पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने 26 सप्टेंबर 2025 रोजी या तीन राज्यांमधील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता आगाऊ जमा केला. या अंतर्गत सुमारे ₹540 कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम जवळजवळ हातातून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा वेळी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार दिवाळीपूर्वीच देशातील सर्व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा हप्ता जमा करण्याची तयारी करत आहे. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे आणि आचारसंहितेच्या आधी सरकार हा हप्ता लवकर वितरित करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जर हा ₹2,000 रुपयांचा हप्ता दिवाळीच्या आधी खात्यात आला, तर तो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने “दिवाळी भेट” ठरेल. मात्र शेतकऱ्यांनी आपला e-KYC पूर्ण केलेला आहे का आणि आधार कार्ड खातेाशी लिंक आहे का, हे तपासून पाहावे. कारण हे सर्व नीट असल्यासच हप्ता त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल.

Leave a Comment